अकोला: जीवघेण्या कोरोना विषाणूचे संकट घाेंगावत असताना केंद्र शासनाकडून दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमतीत वाढ केली जात आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे माेडले आहे. माेदी सरकारच्या धाेरणांचा विराेध करीत शुक्रवारी सिंधी कॅम्प भागात शिवसेनेच्यावतीने केंद्रीय पेट्राेल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळून पेट्राेल दरवाढीचा निषेध करण्यात आला. वर्षभराच्या कालावधीत पेट्राेल व डिझेलच्या किमतीत माेठी वाढ झाली आहे. आजराेजी पेट्राेल १०३ रुपये लीटरच्या पलीकडे गेले असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. केंद्र सरकारने वाहतूक कर कमी केल्यास इंधनाच्या दरात कपात हाेऊ शकते. परंतु भाजप सरकारला सर्वसामान्यांच्या समस्यांशी कवडीचेही साेयरसूतक नसल्याचा आराेप करीत शिवसेनेचे शहर प्रमुख (अकाेला पश्चिम) राजेश मिश्रा यांनी केंद्रीय पेट्राेल मंत्र्यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त केला. शिवसेना नेते खा. अरविंद सावंत, संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर तसेच जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या निर्देशानुसार राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी निदर्शने केली. यावेळी नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशी चाेपडे, संघटक तरुण बगेरे, मा. नगरसेवक शरद तुरकर, सुरेंद्र विसपुते, सागर भारुका, यशवंत सवाई, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, केदार खरे, याेगेश अग्रवाल, युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, याेगेश गीते, किरण येलवनकर, कुणाल शिंदे, मनाेज बाविस्कर, सुरेश इंगळे, रूपेश ढाेरे, गणेश बुंदेले, गाेपाल लव्हाळे, विक्की ठाकूर, रवी अवचार, मुन्ना गीते, अभिषेक मिश्रा, शकील खान, प्रमाेद धर्माळे, अश्विन नवले, रवी घ्यारे, कुणाल वानखडे, रवी सातपुते, संजय अग्रवाल यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित हाेते. सिंधी कॅम्प भागात आंदाेलनाचे आयाेजन मुन्ना मिश्रा, लक्ष्मण पंजाबी, सुनील दुर्गिया, राेषण राज, दीपक पांडे यांनी केले हाेते.
सात दिवस आंदाेलन
इंधन दरवाढीच्या विराेधात शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी शहराच्या विविध भागात सात दिवस निरनिराळ्या प्रकारे आंदाेलनाचे आयाेजन केले आहे. यामध्ये रस्त्यावर बसून स्वयंपाक करण्याचाही समावेश आहे.