अकोला : महाराष्ट्र राज्य राज्य परिवहन महामंडळाच्या खासगीकरणाविरोधात व इतर प्रलंबित ११ मागण्याच्या संदर्भात सोमवार, दि. ७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील व एस.टी. आगार स्तरावरील महाराष्ट्र शासनाच्या विरोधात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. अकोला एस. टी. विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, एस. टी. डेपो येथे तसेच आगारातही बहुजन कर्मचारी संघाच्या परिवहन शाखेमार्फत निषेध आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, परिवहनमंत्री व परिवहन आयुक्तांकडे पाठविण्यात आल्या. याप्रसंगी अकोला जिल्हा शाखेचे श्रीकांत इंगळे, सारंगधर निखाडे, नवेश सिरसाट, विनोद पळसपगार, श्रीकांत वाहुरवाघ व इतरही समविचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आर. एम. बी. के. एस या ट्रेड युनियनने आपल्या परिवहन शाखेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवसी इतरही समविचारी संघटनांना सोबत घेऊन पुकारलेल्या आंदोलनाबाबत एस. टी. कामगार जगताकडून आभार व्यक्त होत आहेत, असे राज्याध्यक्ष राजेंद्र इंगाेले यांनी कळविले आहे.