शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

वीज ग्राहकांना अपघात विरहित सेवा द्या - मुख्य अभियंता भादिकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 2:48 PM

अकोला : जनमित्र व यंत्रचालक यांचा ग्राहकांशी थेट संबंध असल्याने त्यांनी दिलेल्या सेवेतून व कायार्तून महावितरणची प्रतिमा निर्माण करण्याचे अत्यंत महत्वाचे काम आहे. बदलत्या काळाबरोबर सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांशी सात्यत्याने सुसंवाद राखून अपघात विरहीत सेवा देण्याचे आवाहन मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले.

ठळक मुद्देमुख्य अभियंता अरविंद भादीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.अकोला परिमंडळातील एकूण ३९ गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त तांत्रिक कर्मचा-यांचा गौरव आयोजित कार्यक्रम.

अकोला : जनमित्र व यंत्रचालक यांचा ग्राहकांशी थेट संबंध असल्याने त्यांनी दिलेल्या सेवेतून व कायार्तून महावितरणची प्रतिमा निर्माण करण्याचे अत्यंत महत्वाचे काम आहे. बदलत्या काळाबरोबर सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांशी सात्यत्याने सुसंवाद राखून अपघात विरहीत सेवा देण्याचे आवाहन मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले.महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे मंगळवार दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्य मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असणा-या महावितरणच्या अकोला परिमंडळातील एकूण ३९ गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त तांत्रिक कर्मचा-यांचाही गौरव आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. महावितरण कंपनी ही आपली असून तिच्या भरभराटीसाठी दिलेल्या कामात स्वत:ला झोकून द्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले.सदर कार्यक्रमामध्ये अकोला मंडल १३, बुलढाणा मंडल १८ आणि वाशीम मंडल ०८ अशा निवडक यंत्रचालक व जनमित्र यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व सेवेबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी मार्गदर्शन करताना, महावितरणच्या कर्मचाº्यांनी संघटीतपणे व सामुहिकपणे हार्ड सोबतच स्मार्ट वर्क करून ग्राहकांना तत्पर सेवा दिली पाहिजे, वीज बिल वसुली, अचूक व नियमित देयके, यंत्रणेची वेळेवर देखभाल दुरुस्ती आणि अपघातमुक्त महावितरण या बाबींना सर्वांनी प्राथमिकता देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, प्रभारी कार्यकारी अभियंता अजय दिनोरे, विजय महाजन उपस्थित होते. तसेच पृथ्वीराज वानखडे, क्षीरसागर आणि लहाने या तांत्रिक कर्मचा-यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुशील देशमुख यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळ