- संतोष येलकर
अकोला : दुष्काळी परिस्थितीत अचडणीत सापडलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १५ जूनपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकांच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे दिल्या आहेत, असे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गतवर्षीच्या खरीप हंगामात केवळ ३० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते; परंतु यावर्षी शंभर टक्के शेतकºयांना खरिपासाठी १५ जूनपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एक लाख रुपयांपेक्षा जास्त पीक कर्ज घेण्यासाठी शेतकºयांना शेती ‘मॉरगेज’ करावी लागते. त्यासाठी येणाºया खर्चाचा भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागतो. त्यामुळे पीक कर्जाची मर्यादा १० लाख रुपये वाढविण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आग्रह करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.कुचराई केल्यास कारवाई !पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी १५ जूनपूर्वी शेतकºयांना पीक कर्ज वाटप होईल, यादृष्टीने सकारात्मक भूमिका घेण्याचे सांगत, पीक कर्ज वाटपाच्या कामात कुचराई करणाºया अधिकारी व बँकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा किशोर तिवारी यांनी बोलून दाखविला.तालुकास्तरावर कर्ज मेळावे घ्या !खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी १५ मेपासून तालुकास्तरावर कर्ज मेळावे घेण्यात यावे, तसेच ग्रामसभांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन, दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती शेतकरी व ग्रामस्थांना द्यावी, असे निर्देशही किशोर तिवारी यांनी विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकाºयांना लिहिलेल्या पत्रात देण्यात आले.विदर्भ व मराठवाड्यातील सर्व शेतकºयांना खरीप हंगामासाठी १५ जूनपूर्वी पीक कर्जाचे वाटप पूर्ण करण्याच्या सूचना विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकांच्या व्यवस्थापकांना १० मे रोजी पत्राद्वारे दिल्या आहेत.-किशोर तिवारीअध्यक्ष, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन.