मूर्तिजापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांच्या अचानक हल्ल्याच्या घटना सतत घडल्या आहेत. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात टाकून सिंचनासाठी शेतात जावे लागते, त्यामुळे शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे तालुकाध्यक्ष अरविंद कोकाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर शहर अध्यक्ष शरद हजबे, विवेक शिंदे, हरीभाऊ वानखडे, पत्रकार विलास नसले, दीपक बनारसे, अमोल ढोक, मुन्ना नाईकनवरे, आशिष कोकाटे, सुनील भोईकर, श्याम येवले, जय मोहिते, राजू काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------------------
शेतकऱ्यांचा जीव धोक्यात!
सिरसो भागातील शेतकऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रात्रीच्या वेळेस जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागते. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.