अकोट ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आहे. तसेच कोरोना चाचणी करण्यासाठी लोक येत आहेत. या ठिकाणी वयोवृद्ध नागरिक, महिलांची गर्दी होत आहे. रुग्णालय परिसरात योग्य ती पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना त्रासाचे व उन्हाचे चटके सहन करावे लागत होते. अशा स्थितीत संत गजानन महाराज मंदिर संस्थान अंजनगाव रोड अकोटच्या वतीने माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी या ठिकाणी मंडप, शामियाना टाकून सावली उपलब्ध करून दिली. बसण्यासाठी खुर्ची व थंडगार पाणी उपलब्ध करून दिले. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत गोरगरिबांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
फोटो: फोटो मेल