लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. अकोला मधे सुद्धा भारिप बहुजन महासंघच्या पुढाकाराने संविधान गौरव रॅली काढून संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या रॅली मधे भारतीय बौद्ध महासभा, जिजाऊ ब्रिगेड, आरक्षण बचाव कृती समिती, सम्यक विद्यार्थी आंदोलन, संभाजी ब्रिगेड, वकील संघटना, हलबा समाज मंडळ, कुणबी समाज मंडळ, बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन, लहुजी सेना, माळी समाज संघटना, धनगर संघटना, डब्ल्यू पी मुस्लिम संघटना, कोळि संघटना, बांधकाम मजूर असोसिएशन, बेलदार समाज संघटना, गोसावी संघटना, सुतार संघटना एम पि जे मुस्लिम संघटना, गोंधळी समाज संघटना, संत तुकाराम बिजोत्सव समिती, ओ बि सि संघटना, भोइ समाज संघटना, नाथ समाज संघटना, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, यांच्या सह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. भारतीय संविधान प्रास्ताविके चे वाचन करण्यात आले. त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. सर्वात पुढे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सहकार्याने तयार केलेला संविधान रथ त्यानंतर प्रबुद्ध भारत द्वारा तयार संविधान अर्पण रथ देखावा होता. अशोक वाटिका येथून सुरु झालेली हे रॅली बस स्टॅंड मार्गे टावर चौक, रेल्वे स्टेशन चौक मार्गे शिवाजी महाविद्यालय समोरून टिळक रोड, सिटी कोतवाली चौक मार्गे गांधी रोड, तहसील समोरून जिल्हाधिकारि कार्यालय समोरून सर्वोपचार रुग्णालय समोरुन परत अशोक वाटिका येथे राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला यावेळीं २६/११ च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या सर्व शुर पोलिसान्ना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अकोल्यात संविधान दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 8:07 PM
बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. अकोला मधे सुद्धा भारिप बहुजन महासंघच्या पुढाकाराने संविधान गौरव रॅली काढून संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देविविध सामाजिक संघटनांचा उपक्रम प्रा. मेश्राम यांचे आज व्याख्यान