अकोला : विदर्भ चेंबर आॅफ कामर्स अकोल्याच्या पुढाकाराने व सर्व व्यापारी संघटनांच्या एकमताने २५ ते २९ पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या कर्फ्यूसंदर्भात राजकीय पक्ष, लहान व्यापारी यांची नकारात्मक भूमिका असल्याने जनता कर्फ्यूचे स्वरूप कसे राहील, याबाबत संभ्रम कायमच आहे. दरम्यान, या जनता कर्फ्यूच्या धास्तीने गुरुवारी अकोल्याच्या बाजारपेठेत गर्दी उसळली होती.
राजकीय पक्ष म्हणतात...मागील ६ महिन्यांपासून अधिक काळापासून सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रोजच्या उदरनिर्वाहाच्या संकटासोबतच जीवन आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे, अशा स्थितीत जनता कर्फ्यू पर्याय होऊ शकत नाही, कर्फ्यूऐवजी प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजनांसाठी सामूहिक उपक्रम सर्वांच्या समन्वयातून राबविण्याची गरज आहे.रणधीर सावरकर,आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला. जनता कर्फ्यू हा जनतेच्या भल्यासाठी आहे, त्यामुळे नागरिकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रशासन उपाययोजना करतच आहे, त्यासाठी नागरिकांनीही सकारात्मक होऊन सहभागी होणे कुटुंब व समाजाच्या हिताचे आहे.नितीन देशमुख, आमदार व जिल्हाप्रमुख शिवसेना. जनता कर्फ्यूची वाट पाहण्याची वेळ नको. कोरोनाचे संकट हे दीर्घकालीन असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तिने दक्षता घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनाला दूर ठेवावे-संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी काँग्रेस. कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसोबतच सुरक्षेचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. जनता कर्फ्यूमुळे कोरोनाची साखळी तुटत असेल तर नागरिकांनी समर्थन केले पाहिजे.ज्यांना शक्य आहे त्यांनी तो पाळावा.बबनराव चौधरी, महानगराध्यक्ष, काँग्रेस. जनता कर्फ्यूमुळे कोरोना संसर्ग साखळी खंडित होणार नाही; मात्र आता कुठे जनजिवन सुरळीत होत असताना त्याला मात्र बे्रक बसेल. सर्वसामान्यांच्या रोजगारावर गंडांतर येईल, दुकाने बंद राहिली तर तेथील मजुरांना मजुरी मिळणार नाही, त्यामुळे उपाययोजना कराव्या, बंद नको.-प्रमोद देंडवे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी.
नाभिक समाजाचा विरोधनाभिक समाजाची सर्व दुकाने लॉकडाऊनच्या काळात तब्बल ९८ दिवस बंद होती. त्या काळात समाजाने केलेल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावरही अटी शर्तीवर दुकाने सुरू आहेत. या दुकानांच्या भरवशावरच उदरनिर्वाह आहे, त्यामुळे नाभिक समाज जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होणार नाही, असे निवेदन नाभिक समाज दुकानदार संघटनेच्यावतिने अध्यक्ष गजानन वाघमारे, पांडुरंग मानकर, अनिल वायकर, सुभाष निंबोकार, राजेश श्रीवास्तव, जावेद अहेमद आदींनी दिले. भाजीपाला विक्रेता असोसिएशनचा विरोधमहाराष्टÑ चिल्लर भाजीपाला विक्रेता असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात जनता कर्फ्यूला विरोध करत असल्याचे स्पष्ट केले आहे. विदर्भ चेंबरने सर्व व्यापारी संघटनांना विश्वासात घेऊन एकमताने निर्णय घेतला नसल्याचाही आरोप असोसिएशनचे सचिव काशिनाथ ताजणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
भाजीपाल्यावर महागाईचा तडका व्यापाºयांनी पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. शुक्नवारपासून बाजारपेठ खुली होताच भाजीबाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक भाज्यांची कमी झालेली आवक अन् ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता भाजीपाल्याचे दर महागले होते. दरवाढीच्या या तडक्यामुळे ग्राहकांना मात्र भुर्दंड बसला. टमाटे, भेंडी, पालक, कोबी, पत्ताकोबी, मिरची यांसह फळांचीही चढ्या भावात विक्री झाली.