अकोला: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणी कामाचा आढावा घेत, कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकाºयांना दिले.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कर्जमाफीसाठी पात्र थकबाकीदार शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेच्या कामाचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ फेबु्रवारी रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेतला. त्यामध्ये संबंधित मुद्यांवर अकोला जिल्ह्यातील कामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांकडून घेतली. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या आणि शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या गावनिहाय याद्या तातडीने प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. कर्जमाफीसाठी जिल्ह्यात पात्र ठरलेले शेतकरी, बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेले शेतकरी आणि शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या इत्यादी मुद्यांची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारेणीया उपस्थित होते.शेतकºयांना त्रास होता कामा नये!महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, कर्जमाफीचा लाभ देताना शेतकºयांना कोणताही त्रास होता कामा नये, यासंदर्भात काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकाºयांना दिल्या.