अकोला: आग्रा येथे लि डिवाईन ॲन्ड नरुला कंपनीतर्फे आयोजित सौंदर्य स्पर्धेत पुजा विष्णू मुळे हिला मिस इंडिया ब्युटी पेजेंट २०२०-२१ साठी ‘क्वीन मिस इंडिया’ या किताबाने सन्मानित करण्यात आले. पुजा ही मुळ अकोल्यातील रहिवासी असून गत काही वर्षांपासून ती आपल्या आई वडिलांसोबत खांमगाव येथे वास्तव्यास आहे. आग्रा येथे १८ ते २० डिसेंबर दरम्यान मिस इंडिया ब्युटी पेजेंट २०२०-२१ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी देशभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी मिसेस इंडिया २०१८ व मिसेस युनिवर्स २०१९ विजेती रुपल मेहता या मुख्य परिक्षक होत्या. त्यांच्या हस्ते पुजाला ‘क्वीन मिस इंडिया’चा किताब बहाल करण्यात आला. पुजाच्या यशामागे तिची आई आरती मुळे यांचे मोठे योगदान असून गत महिनाभरापासून त्यांनी विशेष तयारी केली होती. पुजा ही मुंबई येथील ओरीएंटल कॉलेज येथे बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन व मल्टीमियीयाची विद्यार्थीनी आहे. तिला लहानपणापासून या क्षेत्राची आवड असून, तीने मिस युनिव्हर्स स्पर्धेचे ध्येय समोर ठेवले आहे.
अकोल्याच्या पुजाने जिंकला ‘क्वीन मिस इंडिया’चा किताब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 8:04 PM
Beauty Contest News आग्रा येथे १८ ते २० डिसेंबर दरम्यान मिस इंडिया ब्युटी पेजेंट २०२०-२१ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देमिस इंडिया ब्युटी पेजेंट २०२०-२१ साठी देशभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मिसेस इंडिया २०१८ व मिसेस युनिवर्स २०१९ विजेती रुपल मेहता या मुख्य परिक्षक होत्या.