डाळींचे दर (प्रति किलो)
हरभरा - ५८
तूर - १०४
मूग - ९६
उडीद - ८८
मसूर - ८६
म्हणून डाळ महागली!
लॉकडाऊनमध्ये किराणा साहित्याच्या मागणीच्या तुलनेत कमी पडणारा पुरवठा, वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि परराज्यातून माल आणण्यात जाणवणाऱ्या अडचणी यामुळे आपोआपच किराणा मालाच्या दरात वाढ झाली होती, असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
तर आता खरिपात पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तूर, सोयाबीनसह इतर दाळवर्गीय पिकांना चांगला दर मिळाला. परिणामी, दाळींच्या किमती वाढल्या असल्याचेही सांगण्यात आले.
म्हणून भाजीपाला कडाडला!
कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी हीच स्थिती परत येऊ नये, याकरिता कमी प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. त्यात आता पावसाळा सुरू आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवकही कमी आहे.
सर्वसामान्यांचे हाल
तीन-चार महिन्यांपासून तेलाचे दर वाढत आहेत. आता डाळीचे दरातही वाढ होत आहे. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. पालेभाज्याच्या दरातही काही अंशी वाढ झाली आहे.
- नीता देशमुख
खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. तुरीचा दर वाढला असल्याने तूर डाळीचा दर वाढला आहे. तूर डाळ १०४ रुपये किलोने विक्री होत आहे. इतर डाळीच्या किमतीतही वाढ झाली आहे.
- दिव्या गवई