अकोला: शहरातील जठारपेठ चौकातील एका देशी दारूच्या दुकानावर खुद्द जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी रविवारी सायंकाळी धाड टाकली. ते स्वत: या दुकानात ग्राहक म्हणून गेले. त्यांनी दुकानदारास ह्यटँगो पंचह्णची बाटली (क्वॉर्टर) मागितली. यावेळी ह्यएमआरपीह्ण दरापेक्षा ज्यादा दराने दारूची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने, देशी दारूचे दुकान ह्यसीलह्ण करण्याची कारवाई करण्यात आली. रविवारी सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी जी.श्रीकांत पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना, वाटेत जठारपेठ चौकातील एम.जी. राऊत यांच्या मालकीच्या देशी दारूच्या दुकानात जिल्हाधिकारी ग्राहक म्हणून गेले. त्यांनी ह्यटँगो पंचह्णची बाटली (क्वॉर्टर) मागितली. टँगो पंच नसल्याने, त्यांना ५0 रुपयांमध्ये ह्यगोवा पंचह्ण दारूची बाटली देण्यात आली. बाटलीवर एमआरपी ४५ रुपये ५0 पैसे असताना, ५0 रुपये कसे घेता, याबाबत जिल्हाधिकार्यांनी विचारणा केली असता, दारूसोबत ४ रुपये ५0 पैशाचा ह्यचखनाह्ण देणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. निर्धारित किमतीपेक्षा (एमआरपी) ज्यादा दराने दारूची विक्री होत असल्याचे आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्वाती काकडे यांना देऊन, दुकान ह्यसीलह्ण करून कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित देशी दारूच्या दुकानातील साठय़ाची तपासणी करून, दुकानाला ह्यसीलह्ण लावण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आली.
*राज्य उत्पादन शुल्क, पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
जिल्हाधिकार्यांनी देशी दारूच्या दुकानात धाड टाकून, 'एमआरपी' पेक्षा ज्यादा दराने दारूची विक्री होत असल्याची बाब उघडकीस आली. जिल्हाधिकार्यांच्या या कारवाईने ही कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.