मूर्तिजापूर: ‘अनलॉक’नंतर जणू काही कोरोना संपला अशा आविर्भावात बिनधास्त फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रशासनाने शहरात मास्क न लावता बिनधास्त फिरणाऱ्या १०४ लोकांवर दंडात्मक कारवाई करून १८ हजार ४०० रुपये दंडाची रक्कम वसूल केली आहे.
शहरात शुक्रवारी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांनी कारवाई करीत मास्क नसलेल्या १०४ लोकांवर दंडात्मक व काही वाहनांवर कलम १८८ नुसार कारवाई केली. दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात यश आले. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दुसऱ्या लाटेचा धोका कमी होताच नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत कुठलेही नियम न पाळता बिनदिक्कत सैराचार सुरू झाला. अधिक कोरोना प्रसार नये, म्हणून संपूर्ण जिह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत येथील नागरिक व दुकानदार गंभीर नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी प्रशासन संयुक्तरीत्या रस्त्यावर उतरत मास्क न लावता शहरात मुक्त संचार करणाऱ्या १०४ लोकांवर दंडात्मक कारवाई करून १८ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. (फोटो)