लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असतानाच अकोला पोलिसांनी बाजारपेठ तसेच शहरासह जिल्ह्यात मास्क न लावणाºया २८४ जणांवर कारवाई केली असून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया ३८ आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई सोमवारी करण्यात आली. या कारवाईत लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाºया २२८ वाहनचालकांवर कारवाई करून ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्याकडून ६२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येत असून, शहरातील ठाणेदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ही मोहीम राबवित कारवाई केली. दरम्यान, या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार घराबाहेर पडल्यानंतर मास्क न वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करताना सोमवारी २८४ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे मास्क वापरून स्वत:चेही रक्षण करून आपल्या आजूबाजूच्यांनाही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मास्क किंवा फेस शिल्ड वापरणे गरजेचे असून, ते न वापरल्यास पोलिसांकडून सोमवारीही कारवाई करण्यात आली असून, कारवाईचा सपाटा सुरूच राहणार आहे. यासाठी पोलिसांचे पथकच कामाला लागले असून, विना मास्क फिरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
मास्क न वापरणाऱ्या २८४ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 4:06 PM