अकोला: ई-रक्तकोष तसेच राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध रक्तसाठ्याची नियमित माहिती अद्ययावत न केल्याप्रकरणी जिल्हा स्त्री रुग्णालयातील रक्तपेढीवर दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे करण्यात आली. सर्व सामान्य नागरिकांना रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याविषयी अद्ययावत व सहज माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने ई-रक्तकोष या संकेतस्थळावर रक्तसाठ्या- विषयी दररोज माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत देखील रक्तसाठ्याविषयी व इतर माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासंदर्भात निर्देशित केले आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही जिल्हा स्त्री रुग्णालयातील रक्तपेढीमार्फत आवश्यक माहिती अद्ययावत झाली नाही. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे रक्तपेढीवर दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयावर दंडात्मक कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:48 AM
Lady Harding Hospital News रक्त संक्रमण परिषदेतर्फे रक्तपेढीवर दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे रक्तपेढीमार्फत आवश्यक माहिती अद्ययावत झाली नाही. ही कारवाई राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे करण्यात आली.