यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मूग पिकाची २२ हजार २७५ हेक्टर म्हणजेच ९८ टक्के क्षेत्रात लागवड वाढ झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी मुगाची लागवड केली होती. मात्र, पावसाचा २२-२३ दिवसांचा खंड पडल्याने अपेक्षित वेळेत पेरणी होऊ शकली नाही. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात उर्वरित शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. परंतु उशिरा पेरणी केल्याने या पिकांचे उत्पादन घटण्याची भीती आहे. जूनच्या सुरुवातीला पेरणी केलेल्या मुगाची आवक सुरू झाली आहे. बाजार समितीत दोन दिवसांमध्ये नवीन मूग खरेदी केल्या गेला आहे. याला दरही चांगला मिळत आहे. मंगळवारी बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील शेतकरी राजू इंगळे यांनी मूग विक्रीसाठी आणला होता.
तालुकानिहाय मुगाची पेरणी
तालुका पेरणी (हेक्टर)
अकोट ७,९३०
तेल्हारा ३,२००
बाळापूर ३,५०६
पातूर १,४००
अकोला ३,९४६
बार्शीटाकळी १,०२८
मूर्तिजापूर १,२६५
दोन दिवसांत १०२ क्विंटल आवक
बाजार समितीमध्ये नवीन मूग येत आहे. सोमवारी ४६ क्विंटल, तर मंगळवारी ५६ क्विंटल मुगाची आवक झाली होती. काही दिवसांमध्ये आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या येणाऱ्या मुगाच्या मालात ओलावा जास्त आहे. यंदा चांगल्या दर्जाचा माल बाजार समितीत येत आहे. मुगाला ६५०० ते ७००० प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे.
- शुभम केडिया, खरेदीदार