शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

तूर खरेदी बंद; शेतक-यांमध्ये आक्रोश

By admin | Published: April 23, 2017 8:57 AM

मोजमापाविना खरेदी केंद्रावर ट्रॅक्टर उभे ; बेभाव तूर विकण्याची आली वेळ

अकोला : मुदतवाढ संपल्याने शनिवारी सायंकाळपासून ह्यनाफेडह्णद्वारे हमीदराने तूर खरेदी बंद करण्यात आली. जिल्ह्यात गत दीड महिन्यांपासून खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत तुरीचे टॅ्रक्टर उभे असतानाच, तूर खरेदी बंद करण्यात आल्याने बाजारात बेभाव तूर विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत होती. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर आणि अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर नाफेडद्वारे तूर खरेदी करण्यात येत होती. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असताना, त्या तुलनेत तूर खरेदीची प्रक्रिया मात्र संथगतीने सुरू होती. बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याने, दीड महिना उलटून जात असला, तरी तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. तुरीच्या मोजमापासाठी शेतकरी प्रतीक्षेत असतानाच, गत १५ एप्रिल रोजी सायंकाळपासून बंद होणाऱ्या तूर खरेदीला ह्यनाफेडह्णद्वारे २२ फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ संपल्याने शनिवार, २२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजतापासून नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आल्याने खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यांपासून मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे असेलेले तुरीचे टॅ्रक्टर मोजमापाविनाच घरी नेण्याची वेळ तूर उत्पादक शेतकऱ्यांवर आली असून, बाजारात व्यापाऱ्यांना कमी दराने तूर विकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरला नाही. त्यामुळे नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.कमी दराने तूर विकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ!हमीदराने ह्यनाफेडह्णद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आल्याने, मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांवर बाजारात व्यापाऱ्यांना कमी दराने तूर विकण्याची वेळ आली आहे. हमीदराने ह्यनाफेडह्णच्या खरेदीत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये दराने तूर खरेदी करण्यात येत होती, तर बाजारात व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये दराने तूर खरेदी करण्यात येत आहे.तुरीचे ६२५ टॅ्रक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत; बाजार समितीने केले पंचनामे!नाफेडद्वारे तूर खरेदी शनिवारी सायंकाळपासून बंद करण्यात आली; मात्र अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे ६२५ ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे आहेत. गत दीड महिन्यापासून मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या या तुरीच्या ट्रॅक्टरचे पंचनामे करण्यात आले.तुरीच्या घुगऱ्या केल्याशिवाय पर्याय नाही; शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया!नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. दीड महिन्यापासून तुरीचे मोजमाप झाले नसल्याने, ट्रॅक्टरचे प्रतिदिवस ५०० रुपयेप्रमाणे भाडे कसे देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बाजारात तुरीला कमी भाव मिळत असल्याने तूर कोठे विकणार, असा सवाल उपस्थित करीत तूर घरी नेऊन घुगऱ्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही, अशा प्रतिक्रिया तूर उत्पादक संदीप ढगे (टाकळी निमकर्दा), प्रवीण फुकट (आगर), संजय गावंडे (टाकळी निमकर्दा), गिरीश देशमुख (उगवा), गजानन धनोकार (वाडेगाव) यांनी व्यक्त केल्या. तसेच मोजमापाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप करून तूर खरेदी सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली; मात्र गत दीड महिन्यांपासून मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीचे मोजमाप क रून तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. याबाबत नाफेडकडे मागणी करण्यात आली आहे. -शिरीष धोत्रे,सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.