संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात ३0 ते ३५ फूट खोल मातीचे उत्खनन करण्या त येत आहे. निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत असल्याने, या भागाला तलावाचे स्वरूप येणार असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.पूर्णा -खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी शिलोडा-कानडी रस्त्यालगत गट नं. ३८ व ३९ मधील सरकारी जमिनीवर (गायरान) मातीचे उत्खनन करण्यात येत आहे. पुणे येथील दीपक नारायण करंगळ यांच्या राइट इन्फ्रास्ट्रक्शन कंपनीमार्फत ५00 मीटर लांबीच्या भागात ‘जेसीबी’द्वारे मातीचे उत्खनन करण्यात येत आहे. गायरान जमिनीवरील माती उत्खननाची परवानगी संबंधित कंपनीमार्फत तीन महिन्यांपूर्वी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली. अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रशासनामार्फत गायनरान जमिनीवरील माती उ त्खननाची परवानगी देण्यात आली असून, उत्खननाच्या निकषानुसार २0 फूट खोल मातीचे उत्खनन करण्याची र्मयादा आहे. परंतु, प्रत्यक्षात गायरान जमिनीवरील ३0 ते ३५ फूट खोल मातीचे उत्खनन करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. सरकारी जमिनीवरील मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत असल्याने शिलोडा-कानडी रस्त्यालगत असलेल्या या भागाला पावसाळ्यात मोठय़ा तलावाचे स्वरूप येणार आहे. मोठय़ा प्रमाणात खोल मातीचे उत्खनन करण्यात येत असल्याने, या भागात पावसाचे पाणी साचल्यास अपघाताचे प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांसह जनावरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
अटी व शर्तींचाही भंग!गायरानातील माती उत्खननासंबंधी देण्यात आलेल्या परवान्यातील अटी व श र्तींचाही भंग होत आहे. उत्खननासाठी देण्यात येणार्या परवान्यातील अटी व श र्तीनुसार सूर्यास्तानंतर मातीचे उत्खनन व वाहतूक करता येत नाही. तसेच २0 फुटापेक्षा जास्त खोल मातीचे उत्खनन करता येत नाही. परंतु शिलोडा शिवारात गायरान जमिनीवर रात्रंदिवस मातीचे उत्खनन सुरू असून, २0 फुटापेक्षा जास्त ३0 ते ३५ फुटापर्यंत खोल मातीचे उत्खनन करण्यात येत असल्याचे या भागा तील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
शिलोडा-कानडी रस्त्यालगत गायरान जमिनीवर मोठय़ा प्रमाणात मातीचे उ त्खनन करण्यात येत आहे. ३0 ते ३५ फुटापर्यंत खोल मातीचे उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागात पावसाचे पाणी साचणार असल्याने, नागरिकांसह जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे उत्खनन करण्यात आलेल्या या भागात तारेचे कुंपण घेण्याची मागणी आम्ही संबंधित कंपनीकडे करण्यात आली; मात्र तारेचे कुंपण न करता मा तीचा भराव टाकण्यात येणार असल्याचे उत्खनन करणार्या कंपनीच्या व्यवस् थापकांकडून सांगण्यात आले.-सुनील सरोदे, नागरिक, शिलोडा.
निकषाप्रमाणे मातीचे उत्खनन २0 फुटापर्यंंत करता येते. अटी व शर्तींच्या अधीन राहून शिलोडा शिवारात मातीचे उत्खनन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ‘रॉयल्टी’च्या तुलनेत मातीचे उत्खनन करण्यात आले की नाही, तसेच निकषानुसार मातीचे उत्खनन झाले की नाही, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.- संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला.