शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खात्यातून काढले सव्वा लाख रुपये, शेतमजुर अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 10:53 AM

१ लाख २५ हजार रुपये त्याच्या बँक खात्यात जमाही झाले होते; मात्र लाभार्थ्याच्या हातात एक रुपयाही आला नाही.

खिरपुरी:बाळापूर तालुक्यातील खिरपुरी येथे शेतीकामासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या कोरकूसमाजाच्या शेतमजुरावर वन्य प्राण्याने हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. मदत म्हणून १ लाख २५ हजार रुपये त्याच्या बँक खात्यात जमाही झाले होते; मात्र लाभार्थ्याच्या हातात एक रुपयाही आला नाही. अन्य व्यक्तिंनी परस्पर सदर खात्यातून एटीएमद्वारे रक्कम काढून आपल्याला लुबाडल्याचा आरोप शेतमजूर गणेश बारस्कार याने निवेदनाद्वारे केला आहे. आपली रक्कम परत न मिळाल्यास आत्मदहनाचा इशाराही त्याने सदर निवेदनात दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,पश्चिम विदर्भात शेतीकामासाठी मजूर मिळेनासे झाल्यामुळे मध्यप्रदेशातील मजूर शेतीकामासाठी इकडे येत असतात. गणेश संतु बारस्कार हा मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील लायवाणी येथील रहिवासी. मागील वर्षी तो बाळापूर तालुक्यातील खिरपुरी परिसरात शेतीकाम करीत असताना त्याच्यावर वन्य प्राण्याने हल्ला केला होता. परिणामी, तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला खिरपुरी व टाकळी खुरेशी येथील दोन व्यक्तिंनी शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्याचा अर्ज करण्यात आला. त्याचे ३०.०९.२०१९ ला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्याळा शाखेत खाते उघडण्यात आले. त्यावर मोबाइल नंबर या दोघांपैकीच एकाचा देण्यात आला. यावर्षी एप्रिलमध्ये त्याच्या खात्यात १ लाख २५ हजार रुपये वन विभाग खात्याकडून जमा करण्यात आले; मात्र लाभार्थ्याला काहीही माहिती न देता त्याचे एटीएम कार्ड या दोघांनी बँकेकडून मिळविले. एटीएमद्वारे त्यांनी ४ एप्रिल २०२० ला १० हजार रुपयांचे दोन विड्रॉल, ६ एप्रिल २०२० ला १० हजार रुपयांचे दोन विड्रॉल, ७ एप्रिल २०२० ला १० हजार रुपयांचे दोन विड्रॉल, ९ एप्रिल २०२० ला १० हजार रुपयांचे दोन विड्रॉल, २२ मे २०२० ला १० हजार रुपयांचे दोन विड्रॉल आणि १० आॅगस्ट २०२० ला ३ हजार रुपयांचा विड्रॉल करण्यात आला. असे एकूण त्याच्या खात्यातील रक्कम या दोघांनी लुबाडल्याचा त्याने आरोप केला आहे. गरिबाचा घास अन्य भामट्यांनी ओरबडून नेल्याचे त्याला काही दिवसांआधी समजताच त्याने चौकशी केली; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. सदरकामी या दोघांना व्याळा येथील तत्कालीन जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा व्यवस्थापक ढोले यांनीही मदत केल्याचा आरोप सदर शेतमजुराने आपल्या निवेदनात केला आहे. या प्रकरणात अकोला उप-वनसंरक्षक कार्यालयातील एसीएफ वडोदे यांनीही पैसे घेतल्याचा आरोप सदर शेतमजुराने केला आहे. आपली रक्कम परत न मिळाल्यास वडोदे यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्याने दिला आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर असून, याची प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर शेतमजुराला न्याय मिळावा, याकरिता शासनाने प्रामाणिक प्रयत्न करावे, अशी मागणी शेतमजुरांनी केली आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूर