शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

थकबाकीदारांना कर्ज वाटपावर प्रश्नचिन्ह

By admin | Published: June 18, 2017 2:22 AM

खरीप पेरण्या सुरू ; बँकांपर्यंत आदेश पोहोचलाच नाही.

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थकबाकीदार शेतकर्‍यांना तातडीने दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे; मात्र यासंबंधीचे आदेश अद्याप बँकांमार्फत पोहोचले नसल्याने, कर्ज वाटप सुरू करण्यात आले नाही. खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र कर्ज वाटप सुरू करण्यात आले नसल्याने, जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी दहा हजार रुपयांचे कर्ज केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना तातडीने कर्जमाफी देण्यासह अटींच्या आधारे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, थकबाकीदार शेतकर्‍यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १0 हजार रुपयांच्या र्मयादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले. त्यानुसार, ३0 जून २0१६ अखेर जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी दहा हजार रुपयांपर्यंत ता तडीने कर्ज मिळणे अपेक्षित आहे; परंतु थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्याचा आदेश जिल्हय़ातील बँकांपर्यंत १७ जूनपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे थकबाकीदार शे तकर्‍यांना कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया बँकांमार्फत अद्याप सुरू करण्यात आली नाही. जिल्हय़ात खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप सुरू झाले नसल्याने, बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्ज केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पीक कर्जाचे वाटपही रेंगाळले; केवळ २८२ कोटी कर्जाचे वाटप!यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हय़ात ११४0 कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्हय़ात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके सह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत १७ जूनपर्यंत जिल्हय़ात ३६ हजार ४७५ शेतकर्‍यांना केवळ २८२ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ात पीक कर्जाचे वाटपही रेंगाळले आहे.पेरणीपूर्वी लाभ मिळणार?आदेशाअभावी जिल्हय़ातील बँकांमार्फत थकबाकीदार शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटपाची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकर्‍यांना खरीप पेरणीसाठी निविष्ठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना या कर्ज वाटपाचा लाभ खरीप पेरणी सुरू होण्यापूर्वी मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.थकबाकीदार शेतकर्‍यांना तातडीने दहा हजार रुपयांपर्यंंत कर्ज वाटप करण्याबाबत शासनाचे आदेश जिल्हय़ातील बँकांच्या शाखांपर्यंत अद्याप पोहोचले नाही, त्यामुळे कर्ज वाटप करण्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. आदेश पाहोचल्यानंतर बँकांमार्फत थकबाकीदार शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांपर्यंंत कर्ज वाटपाचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे.-तुकाराम गायकवाड,व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.