रस्त्यावर मातीमुळे धूळ
अकाेला : गाैरक्षण राेडवरील एका मैदानात निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपूलाचे विविध भागाचे काम करण्यात येत आहे. त्यामूळे माेठया प्रमाणात माती काढण्यात आली असून ही माती राेडवर येत असल्याने वाहन चालकांना त्रास हाेत आहे. त्यामूळे संबधीत कंपनीने रस्तयावर आलेली माती तातडीने उचलण्याची मागणी हाेत आहे.
गाैरक्षण राेडवर बाजार
अकाेला : गाैरक्षण राेडवर माेठया प्रमाणात भाजी पाला व फळ विक्री सुरु झाली आहे. त्यामूळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत असून या विक्रेत्यांनी त्यांची दुकाने रस्त्याच्या कडेला लावतांना वाहतुकीला अडथळा निर्माण हाेणार नाही असे लावावे अशा सुचना त्यांना वाहतुक शाखा तसेच खदान पाेलीसांनी केल्या आहेत.
काैलखेड चाैकात अतीक्रमन वाढले
अकाेला : बार्शिटाकळी राेडवरील काैलखेड चाैकात माेठया प्रमाणात अतीक्रमन वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्म्ाण हाेत आहे. मनपाच्या अतीक्रमन विभागाने या पिरसरातील अतीक्रमन काढावे अशी मागणी करण्यात आली आहे.
आकाेट फैलमध्ये दारुची अवैध विक्री
अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात अवैध दारु विक्री जाेरात असुरु आहे. याकडे पाेलीसांचे दुर्लक्ष हाेत असल्याने आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष पथक तसेच शहर पाेलीस उपअधीक्षक यांच्या पथकाकडून या ठीकाणच्या दारु विक्रेत्यांवर कारवाइ करण्यात आलेली आहे.
रस्त्यामुळे नागरिक हैरान
अकाेला : आकाेट फैल बापू नगर ते दम्मानी नेत्र हाॅस्पीटलपर्यंत रस्ता खाेदण्यात आला असून कच्चा माल यावर टाकण्यात आला आहे. या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे कामकाज तातडीने करावे यासाठी नगरसेवीका चांदनी रवि शिंदे यांनी निवेदनही दिले आहे.