पणज परिसरात ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, कांदा, पान पिंपरी पिकांची वाढ खुंटली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. वातावरणातील बदलांमुळे रब्बी पिकांवर राेगराई पसरली असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. सध्या हरभऱ्याचे पीक बहरले असून, तुरीच्या सोंगणीची लगबग सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढला असून, तुरीची सोंगणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
---------------
गत चार ते पाच दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा, तूर, भाजीपाला पिकांवर रोगराई पसरली आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
-अनिल रोकडे, शेतकरी पणज.
------------------
रब्बी पिकांवर अळीचे आक्रमण वाढले आहे. महागड्या किटकनाशकांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.
विनोद जायले, शेतकरी बोचरा.