शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
2
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
3
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
4
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
5
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
6
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
7
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
8
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
9
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
11
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
12
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
13
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
14
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
15
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
16
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
17
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
18
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
19
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...

रब्बी पिकांना गारपीटचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 3:49 PM

अकोला : वादळीवारा आणि गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसाने बार्शीटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अकोला : वादळीवारा आणि गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसाने बार्शीटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बार्शीटाकळी तालुक्यामध्ये दोनद खु., उजळेश्वर, राहीत, साहीत येथे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.बार्शीटाकळी : तालुक्याला १६ एप्रिलच्या सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान वादळी पावसासह गारपिटीने झोडपल्याने रब्बी, फळबाग व भाजीपाला पिके भुईसपाट झाली. अवघ्या २० ते २५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले. तालुक्यातील शेलगाव, बोरमळी, शेलु खु., मोझरी बु., पुनोती, उजळेश्वर, तिवसा, राहित, साहित, दोनद आदी ठिकाणी तुफान गारपीट व वादळी पाऊस झाल्याने लाखो रुपयांची हानी झाली. शेलु खु. येथील कैलास महल्ले, उल्हास महल्ले, सुभाष महल्ले, भास्कर काकड या शेतकऱ्यांचे लिंबु, भाजीपाला, बीजोत्पादन, कांदा आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. उजळेश्वर येथील शेतकºयाची पपईची फळबाग भुईसपाट झाली. पुनोती परिसरात आंब्याचे नुकसान झाले. पुनोती परिसरात जबरदस्त पावसासह गारपीट झाली आहे. इतर तालुक्याच्या भागात पाऊस झाला आहे. राहीत येथील सचिन चव्हान, मनोज देशमुख, तेजराव वाहुरवाघ, धनंजय देशमुख, अरूण देशमुख, अंबादास वाहुरवाघ, पुनोती येथील रवींद्र सावरकर, सुनील घोंगे, रामचंद्र काकड, वेणु इंगळे यांचे कांदा बीजोत्पादन प्लॉट गारपिटीने उद्ध्वस्त झाला असून, लाखोंचे नुकसान झाले आहे. राहीत येथील मनोज देशमुख यांचे गव्हाचे पीक गारपिटीने उद्ध्वस्त झाले आहे.

निवडणुकीमुळे पंचनामे पुढे ढकललेअकोला लोकसभा मतदार संघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. आज मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना होणार असल्याने वादळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या पीक नुकसानाचे महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येणार नाहीत. ही वस्तुस्थिती दिसत आहे.पीक नुकसानाची माहिती मिळाली; परंतु महसूल कर्मचारी, अधिकारी हे १७ एप्रिल रोजी निवडणुकीच्या कामासाठी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. त्यामुळे पंचनामे होणे शक्य नाही, तरीही आवश्यकतेनुसार पंचनामे करण्याचा प्रयत्न करू.- गजानन हामंद,तहसीलदार, बार्शीटाकळी.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाHailstormगारपीटRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी