शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

३२ टक्के पीक कर्ज वाटपावरच गुंडाळला रब्बी हंगाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:25 PM

जिल्ह्यातील केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांना २३ कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे ३२.८१ टक्के पीक कर्ज वाटपावरच यावर्षीचा रब्बी हंगाम गुंडाळण्यात आल्याचे वास्तव आहे.

अकोला: जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात ७० कोटी २९ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे; मात्र रब्बी हंगाम संपला असला, तरी उद्दिष्टाच्या तुलनेत फेबु्रवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांना २३ कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे ३२.८१ टक्के पीक कर्ज वाटपावरच यावर्षीचा रब्बी हंगाम गुंडाळण्यात आल्याचे वास्तव आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७० कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यानुषंगाने गत आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शेतकरी रब्बी पीक कर्ज वाटपाचे काम सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील रब्बी हंगाम संपला असताना, रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लक्षात घेता, त्या तुलनेत २८ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील केवळ २ हजार २०० शेतकºयांना २३ कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि त्या तुलनेत बँकांमार्फत प्रत्यक्षात करण्यात आलेले कर्ज वाटपाचे प्रमाण विचारात घेता, दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात ३२.८१ टक्के पीक कर्ज वाटपावरच रब्बी हंगाम गुंडाळण्यात आल्याचे वास्तव समोर येत आहे.

रब्बी पीक कर्ज वाटपाचे असे आहे वास्तव!

  • -कर्ज वाटपाचे उद्दिष्ट : ७० कोटी २८ लाख रुपये.
  • -२८ फेबु्रवारीपर्यंत कर्ज वाटप : २३ कोटी ०६ लाख रुपये.
  • -कर्जाचा लाभ मिळणारे शेतकरी : २ हजार २००
  • -कर्ज वाटपाची टक्केवारी : ३२.८१ टक्के . 

यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात ७० कोटी २८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत २२०० शेतकºयांना २३ कोटी ६ लाख रुपये (३२.८१ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.- जी. जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्ज