रघुनाथ गडम यांचे निधन
अकोटः अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील प्रतिष्ठित नागरिक रघुनाथ जगदेवराव गडम (८२) यांचे दि. २४ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या मागे मुले, नातवंड, सुना असा बराच मोठा परिवार आहे. ते भाजप महिला आघाडी अध्यक्ष, माजी सरपंच सिंधुताई गडम यांचे सासरे होत. (फोटो)
-------------------------------
मंजुराबाई गोमासे यांचे निधन
पातूर: तालुक्यातील खानापूर येथील मंजुराबाई तुळशीराम गोमासे (७७) यांचे दि. २३ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे चार मुली, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)
--------------------
श्रीराम सिरसाट
पातूर: खानापूर येथील श्रीराम सुखदेव सिरसाट (५५) यांचे दि. २४ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)