अकोला: भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे 100 पदाधिकारी व कार्यकर्ते 17 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता वडेगाव येथे दाखल झाले आहेत. संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात राहुल गांधी वरखेड येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत.
संभाजी ब्रिगेड व शिवसेना यांची नुकतीच आघाडी झाली आहे. देशामध्ये सुरू असलेले धर्माचे राजकारण आणि वाढत असलेली बेरोजगारी, सामाजिक विषमता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भारत जोडो यात्रा काढण्यात येत आहे.
या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शंभरावर कार्यकर्ते वाडेगाव येथे दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविणारा असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांनी दिली.