अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोठया उमरीत सुरु असलेल्या मोठया जुगार अड्डयावर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने सोमवारी उशीरा रात्री छापा टाकला. या ठिकाणावरुन सात जुगारींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे.मोठी उमरीतील टिकार यांचे घराजवळ सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापेमारी केल्यानंतर वामनराव पुंडकर, कैलास पुनकर, अजाबराव दहेस्कर, दीपक लहाळे, बाळकृष्ण मेश्राम, दिनेशकुमार जैन आणि अनुप पुंडकर सर्व राहणार अकोला यांना रंगेहाथ अटक केली. या जुगार अड्डयावरुन मुख्य आरोपी रामदास टिकार व जयस्वाल हे फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या जुगार अड्डयावरुन वरली चिठ्ठी, 07 मोबाईल 02,मोटार सायकल रोखरक्कम असा एकूण 1 लाख20 हजार 830 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सातही जुगारींविरुध्द सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाचे प्रमूख पीएसआय तुषार नेवारे, विनय जाधव, राज चंदेल, मनोज ठोसर यांनी केली.शहरासह जिल्हयात जुगार अड्डे प्रचंड फोफावले असून पोलिसांचे त्याकडे ‘अर्थ’पुर्ण दुर्लक्ष असल्याचे वास्तव आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डयांचा बोलबाला आहे.
मोठया उमरीतील जुगारावर छापेमारी; सात जुगारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:43 PM