लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : समाजकल्याण विभागामध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविणार्या यवतमाळ जिल्हय़ातील दारव्हा येथील शुद्धोधन तायडे या मुख्य सूत्रधाराच्या घरावर सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापेमारी केली. या ठिकाणावरून पोलिसांनी समाजकल्याण विभागाचे बनावट शिक्के, जातीचे दाखले, बनावट कागदपत्रे आणि रोख ४0 हजार रुपये जप्त केले. शुद्धोधन तायडे फरार असून, सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख त्याचा शोध घेत आहेत. अकोल्यातील रहिवासी सचिन कुरई याला यवतमाळ येथील रहिवासी शुद्धोधन तायडे याने समाजकल्याण विभागामध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. या आमिषाला बळी पडत सचिन कुरई याने तायडेसोबत नोकरी मिळविण्यासाठी तीन लाख रुपयांमध्ये व्यवहार पक्का केला. या व्यवहारानुसार कुरई याने नोकरीसाठी तायडे याला सुरुवातीला दोन लाख रुपयांची रक्कम दिली. यामध्ये कुरईसोबतच सागर गोक टे व आणखी एकाने म्हणजेच तीन जणांनी तायडेला तब्बल सहा लाख रुपयांची रक्कम दिली. त्यानंतर तिघांचीही दीड लाख रुपयांची रक्कम बाकी असल्याने शुद्धोधन तायडे याने तिघांनाही बनावट नियुक्तिपत्र देऊन उर्वरित दीड लाख रुपयांची मागणी केली; मात्र या प्रकरणामध्ये फसवणूक झाल्याचे सागर गोकटे याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने सचिन कुरई व आणखी एकास हा प्रकार न सांगता त्यांच्याकडून उर्वरित दीड लाख रुपयांची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्याने हा प्रयत्न स्वत:चे गेलेले दोन लाख रुपये काढण्यासाठी केला; मात्र नोकरी लावून देण्याच्या नावाखाली लुबाडणूक झाल्याचे सचिन कुरई याच्या लक्षात येताच त्याने सदर प्रकरणाची तक्रार २७ जुलै रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात केली. सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तक्रार दाखल करून घेत आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणातील सागर गोकटे या आरोपीस अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर समोर आलेल्या माहितीच्या आधारे शुद्धोधन तायडे याच्या दारव्हा येथील घरावर छापा टाकला. या घरातून रोख ४0 हजार रुपये, समाजकल्याण विभागाचे बनावट दस्तावेज, शिक्के, शाळा सोडल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केले आहे. यावरून सदर रॅकेटमध्ये आणखी मोठी नावे समोर येणार असल्याची माहिती आहे.
नोकरीचे आमिष देऊन फसविणार्याच्या घरावर छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:46 AM
अकोला : समाजकल्याण विभागामध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविणार्या यवतमाळ जिल्हय़ातील दारव्हा येथील शुद्धोधन तायडे या मुख्य सूत्रधाराच्या घरावर सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापेमारी केली. या ठिकाणावरून पोलिसांनी समाजकल्याण विभागाचे बनावट शिक्के, जातीचे दाखले, बनावट कागदपत्रे आणि रोख ४0 हजार रुपये जप्त केले. शुद्धोधन तायडे फरार असून, सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख त्याचा शोध घेत आहेत.
ठळक मुद्देबनावट शिक्क्यांसह दस्तावेज जप्तदारव्हा येथे कारवाई