अकोला: विशेष पोलीस पथकाने एमआयडीसह जुने शहरातील दोन वरली अड्ड्यांवर सोमवारी छापा घालून १८ जणांना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी ४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय नितीन चव्हाण यांच्या विशेष पथकाला एमआयडीसी व जुने शहरात वरली अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सर्वप्रथम जुने शहरातील यशवंत नगरातील हिरा प्रकाश घुमरे याच्या वरली अड्ड्यावर छापा घातला आणि वरली जुगार खेळणारे नीलेश राजू बाबर (रा. हरिहरपेठ), अजय संतोष गिºहे (रा. सिद्धार्थवाडी), फरान खान अफरोज खान (अंबिका नगर), नीलेश बाबुसिंग चव्हाण (गीता नगर), वसिम खान अहमद खान (सैयद दर्गा परिसर), प्रवीण प्रभाकर वानखडे (पंचशील नगर), योगेश सुधाकर मोरे (यशवंत नगर) यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख २४ हजार ११0 रुपये, चार मोबाइल असा एकूण ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई एमआयडीसी परिसरातील वरली अड्ड्यावर करण्यात आली. येथील अड्ड्यावर छापा घालून पोलिसांनी फिरोज खान दौलत खान, गौतम वासुदेव खंडारे, गजानन तुकाराम खंडारे, रमेश दयाराम बाजड, शेख सईद शेख लालमिया, कैलास राघोजी मरसकोल्हे, वासुदेव झेंडुजी गोपनारायण, जब्बार खान जोरावर खान, मोहम्मद जाकीर मोहम्मद रफीक, बबन राघोजी पुंडगे, रहीम खान गुलाब खान, सिद्धार्थ महादेवराव अंभोरे यांना अटक केली. तसेच मुज्जू पठाण, शंकर जाधव, चव्हाण हे आरोपी फरार झाले. पोलिसांनी आरोपींकडून ८ हजार रुपये रोख, सात मोबाइल, सहा दुचाकींसह एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी)