अकाेला : पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी शहरातील दाेन जुगार अड्डयावर छापेमारी केली. या ठिकाणावरुन १५ जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सिध्दार्थ वाडी वाशिम बायपास व जनता भाजी बाजार येथे माेठया प्रमाणात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरुन पथकाने दाेन्ही जुगार अड्डयावर छापेमारी करून राजेश गोविंदाराव बोर्ड वय ५६ वर्ष रा.वसंत टॉकीज जवळ, प्रशांत प्रभाकर रंगारी वय ५८ वर्ष रा. जठारपेठ, रोहीदास शंकरराव सुलताने वय ३० वर्ष रा.रणपिसे नगर जठारपेठ, गोविंदा तुकारामजी पालखेडे वय ३२ वर्ष रा.बाळापूर नाका जुने शहर, अशोक बाळकृष्ण भाकरे वय ५८ वर्ष रा. शिवाजी नगर जुने शहर, वसीम अकरम खान हसन खान वय ३१ वर्ष रा.मोहम्मद अली रोड बैदपूरा, मोहम्मद नुर उल्ला मोहम्मद वलायत उल्ला वय ५६ वर्ष रा.मुल्लाणी चौक खदान, केशव हरीभाऊ गावंडे वय ६५ वर्ष रा.हरीहरपेठ पोलीस चौकी जवळ यांना ताब्यात घेतले. तर हे जुगार अड्डा चालविणारा मेहबुब खाँ बिराम खॉन उर्फ मब्बा रा. बैदपूरा हे पसार झाले. सिध्दार्थ वाडी वाशिम बायपास येथील जुगाराव धाड टाकली असता त्या ठिकाणावरुन सुशिल शालीग्राम वाघमारे वय ३३ वर्ष रा.सिध्दार्थ वाडी वाशिम बायपास, मनोज दगडु सुरोशे वय ३२ वर्ष रा.पंचशिल नगर वाशिम बायपास, उल्हास बालीकराम सिरसाठ वय ४० वर्ष रा.पंचशिल नगर वाशिम बायपास, रवि प्रकाश दामोदर वय ३५ वर्ष रा.कमला नेहरू नगर वाशिम बायपास, हिरा प्रकाश घूमरे ३० वर्ष रा.सिध्दार्थ वाडी वाशिम बायपास हा पळुण गेला.दोन्ही ठिकाणी केलेल्या छापेमारीत २५ हजार ७५० रूपये राेख आणि मोबाईल जुगार साहीत्य असा एकुण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाइ जी.श्रीधर पोलीस अधीक्षक, मोनिका राऊत अपर पोलीस अधिक्षक,यांच्या मार्गदर्शनाखाली विलास रमेश पाटील पोलीस निरिक्षक विशेष पथक व त्यांच्या पथकाने केली आहे.
अकाेला शहरातील दाेन जुगार अड्डयावर छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 5:49 PM