दहा जुगारी अटकेत, मुद्देमाल जप्त
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरळ शेत शिवारात एका शेतात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवाद विरोधी कक्षाने मंगळवारी छापा टाकला. या ठिकाणावरून दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
उरळ येथील शेतकरी पांडुरंग पोहरे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी छापा टाकून जुगार अड्ड्यावरून ओंकार सीताराम भोजने, रवी अजाबराव भोजने, हरिदास चंद्रभान भोजने, विनोद शंकर भोजने, राहुल वानखेडे, माणिकराव पुंडलिक शिगणारे, माणिक संभाजी भोजने, प्रल्हाद बाबूलाल धमने, पंकज गजानन इंगळे व सुरेश सुदामा वानखडे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.