अकोला, दि. १७- जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे यांनी जबाबदारी स्वीकारताच संपूर्ण जिल्हय़ात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या विशेष पथकाने गुरुवारी वादग्रस्त आणि दादागिरी करणार्या दोन ठिकाणच्या जुगार अड्डय़ांवर धडक कारवाई करीत मुद्देमाल जप्त केला असून, पाच जणांविरुद्ध कारवाई केली आहे.खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ख्रिश्चन कॉलनी येथे सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे यांनी गोपनीय माहितीवरून छापा टाकला. त्यानंतर या जुगार अड्डय़ावरून राम जयराम खंडारे आणि सचिन संतोषसिंह टांग यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वरली मटक्याचे साहित्य एक मोबाइल असा चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन जुगारींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ अ प्रमाणे कारवाई केली, यासोबतच महाबीज केंद्राच्या पाठीमागे सुरू असलेल्या दुसर्या जुगार अड्डय़ावर छापा टाकून रोजीक खान तोहीत खान, शांताराम शालीकराम वानखडे, पुंडलीक खंडोजी कुबडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तीनही जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ अ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
दोन जुगार अड्डय़ांवर छापेमारी
By admin | Published: March 18, 2017 2:33 AM