दहशतवाद विरोधी पथकास गुन्हे शोधकामी बार्शीटाकळी येथे पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील वंजारी व रंगारी पुरा या दोन ठिकाणी सुरू असलेल्या वरली जुगारावर छापा टाकला असता काही जण वरली जुगारावर पैशांची खायवाडी व लागवडी करताना मिळून आले. यामध्ये सतीश रायभान मालठाणे (३६) (रा.शहापूर), अमर त्र्यंबक जामनीक (३०), (रा.इंदिरा आवास), शेख कासम शेख हनीफ (३८) (रा.अकोली वेस), अनिल दामोदर राठोड (३५) (रा.काजळेश्र्वर), सैयद सालर सयद छोटू (४५) (रा इंदिरा नगर), नाजिम शालम शहा ( ३८) (रा. बार्शीटाकळी), मोहन रामकृष्ण बोबडे (४२) (रा. वांजरी पुरा, बार्शीटाकळी), शशिकांत महादेव केदारे (४४) (रा.तेलीपुरा बार्शीटाकळी) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ४,३०० रुपये नगदी व तीन मोबाईल असा एकूण ७,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो)
--------------------------
बार्शीटाकळीत अवैध धंद्यांना उत!
शहरात अवैध धंद्यांना उत आले असून, याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. शहरातील सुरू असलेले अवैध धंदे सायंकाळी ५ वाजतानंतरही मध्यरात्रीपर्यंत खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे.