अकाेला : एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी पदभार स्वीकारताच साेमवारी रात्री उशिरा छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून ९ जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगारावरून ४ आराेपी फरार झाले असून, पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक शहरात अवैद्य धंद्यावर छापा टाकण्यासाठी गस्त घालत असतानाच राहुल नगर शिवणी खदान परिसरात माेठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने छापा टाकून रवि विजय गवई वय ३२ वर्षे रा.राहुल नगर शिवणी, मोहन राजाराम सोनोने वय ५७ वर्ष रा.राहुल नगर, श्रीराम पांडुरंग खरात वय ४६ वर्षे रा.सुंदर नगर शिवणी, विजय श्रीराम गवई वय ५६ वर्षे रा.राहुल नगर शिवणी, आकाश श्रीराम मोरे वय २१ वर्षे रा.राहुल नगर शिवणी, शंकर ज्ञानदेव नागे वय ३५ वर्षे रा. शिवणी खदान, प्रमोद गणेशलाल लोध वय ३५ वर्षे रा.हरिहर पेठ, सैदय अजीम सय्यद आमद वय ४० वर्षे रा.
मदिना मस्जीदजवळ शिवणी, शेख वसीम शेख हबीब वय ३० वर्षे रा.देवी पोलीस लाइन, या नऊ जणांना ताब्यात घेतले. तर एम एच ३० एक्स ०७२२ चा चालक, एम एच ३० ओ आर ३९६२ चा चालक, एम एच ३० असी १८२७ चा चालक आणि खायवाडी करणारा इसम शेख फरीद ऊर्फ राजू शेख बिस्मील्ला वय अं. ३१ वर्ष रा.राहुल नगर शिवणी खदान हे फरार झाले. ताब्यात घेतलेल्या जुगारींकडून राेख २३ हजार ५० रुपये, विविध कंपण्यांच्या एकूण ०४ मोटर सायकली तसेच एक फोरव्हिलर, मोबाइल जुगार उपयोगी साहित्य असा एकूण ४ लाख ४४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी. येथे जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जी.श्रीधर पोलीस अधीक्षक, मोनिका राऊत अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील पोलीस निरीक्षक विशेष पथक व त्यांच्या पथकाने केली आहे.