पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडा ते कुटासा रस्त्यावरील खुल्या पटांगणावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर १ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत यशवंत भानुदास ढोकणे, रा. दहीहंडा, गजानन सुखदेव आठवले, रा. दहीहंडा यांना ताब्यात घेतले, तर पुरुषोत्तम ढोरे, रा. सुकळी, प्रकाश मोरे, दहीहंडा हे दोघे फरार झाले. या कारवाईत पोलिसांनी २,९३० रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच दहीहंडा प्रवासी थांब्याजवळील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत असोल तुकाराम आठवले, रा. दहीहंडा यास ताब्यात घेण्यात आले. तर आशिष गावंडे, रा. जैनपूर पिंपलोद हा फरार झाला. त्यांच्याकडून वरली मटका साहित्यासह एक मोबाइल किंमत ५०० व नगदी २५०० असा एकूण ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पो.स्टे.चे संभाजी हिवाळे यांच्या फिर्यादीवरून दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार अॅक्टप्रमाणे १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय संभाजी हिवाळे करीत आहे.
दोन ठिकाणी जुगारावर धाड; तीन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:13 AM