अकोला: दोन दिवसांपासून विदर्भात पाऊस पडत असल्याने कपाशी पिकाची पाते, फुले गळाली,सोयाबीन भिजले.फळ पिकांचेही नुकसान झाले .सध्या ईशान्येकडून वारे वाहत असून, २३ आॅक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.सद्यस्थितीत ईशान्येकडून पावसाचे वारे वाहत असून, राज्यात बहुतांश ठिकाणी परतीचा पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपासून पश्चिम विदर्भातील काही भागाात पाऊस पडत आहे. हा पाऊस २३ आॅक्टोबरपर्यंत राहील. तर विदर्भात जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचा परिणाम खरीप पिकांवर झाला असून, उडीद हातचा गेला आहे. आता सोयाबीन काढणी सुरू आहे. कपाशी पीक काही ठिकाणी बोंड्यावर, बहुतांश ठिकाणी फुले, पात्यावर आले आहे; परंतु परतीच्या पावसामुळे दोन्ही पिकांचे नुकसान होत असून, काढण्यात आलेले सोयाबीन पाण्याने भिजले आहे. कपाशीची, पाते, फुलगळ सुरू आहे. हा पाऊस असाच राहिल्यास पिकांचे मोठे नुकसान होेण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे.अकोला जिल्ह्यात शनिवारी बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. पीक कापणी सुरू असतानाचा हा पाऊस कोसळल्याने शेतकरी, मजुरांना सोयबीन काढणीचे काम अर्धवट सोडावे लागले. काढलेले सोयाबीन पाण्यात भिजले. ट्रॅक्टरही शेतात फसल्याचे प्रकार घडले.
- शेतकरी आर्थिक संकटातया पावसामुळे पपई, लिंबू, संत्रा या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात फटका बसला,. दिवसभरात अधूनमधून जोरात कोसळलेल्या या पावसामुळे पपई आणि लिंबूची फळे जमिनीवर गळून पडली, तर अंबिया बहारातील संत्राचेही बरेच नुकसान झाले. त्याशिवाय काढणीवर आलेले आणि काढून ठेवलेले सोयाबीन या पावसामुळे भिजल्याने या शेतमालाचा दर्जाही खालावणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसाच्या रुपाने आलेल्या एका नव्या संकटाने शेतकºयांना पुन्हा आर्थिक संकटात टाकले आहे.सध्या ईशान्येकडून वारे वाहत असून, २३ आॅक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस राज्यात राहील. विदर्भात हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. खरीप पिकांची काढणी सुरू असेल किंवा झाली असेल तर शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पीक भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.- डॉ. रामचंद्र साबळे,ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ,पुणे.