शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

पावसामुळे पोलिस भरतीत व्यत्यय; वेळापत्रकात बदल; एक हजार उमेदवारांची ९ जुलैला घेणार चाचणी

By आशीष गावंडे | Published: June 22, 2024 7:45 PM

२२ जून रोजी एक हजार उमेदवारांची घेतली जाणारी चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून संबंधित उमेदवारांना ९ जुलैची तारीख देण्यात आली आहे. 

 अकाेला: जिल्हा पाेलिस दलाच्यावतीने पाेलिस शिपाई पदाच्या १९५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. दरम्यान, २१ जूनच्या मध्यरात्री पाऊस आल्यामुळे पोलिस भरतीमध्ये व्यत्यय आला आहे. २२ जून रोजी एक हजार उमेदवारांची घेतली जाणारी चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून संबंधित उमेदवारांना ९ जुलैची तारीख देण्यात आली आहे. 

पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर पाेलिस शिपाई पदाच्या  भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात पुरुष वर्ग व दुसऱ्या टप्प्यात महिला वर्गातील उमेदवारांना बाेलावण्यात आले आहे. चाचणी दरम्यान पुरुष उमेदवारांच्या छाती व उंचीचे मोजमाप घेतली जात आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पात्र उमेदवारांची सर्वप्रथम १०० मीटर धावण्याची चाचणी व गोळाफेक चाचणी घेऊन त्यानंतर १६०० मीटर धावण्याची चाचणी ही वसंत देसाई स्टेडीयममध्ये घेण्यात येत आहे. 

उमेदवारांचा मुक्काम, वाहतुकीची केली व्यवस्था जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार पोलिस भरतीसाठी एक दिवस आधी बाहेरगावावरून आलेल्या उमेदवारांच्या मुक्कामाची व्यवस्था पाेलिस लाॅनमधील राणी महलमध्ये निःशुल्क स्वरूपात करण्यात आली आहे. मैदानावर चाचणी दरम्यान पाणी, शौचालय, रूग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच उमेदवारांना पोलिस मुख्यालयापासून वसंत देसाई स्टेडियम पर्यंत नेण्यासाठी वाहन व्यवस्था केली आहे. 

१६ हजार १६१ पुरुष उमेदवारांचे अर्जपदभरतीसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत .यामध्ये १६ हजार १६१ पुरुष उमेदवार आहेत. २२ जून राेजी १हजार उमेदवारांची चाचणी घेतली जाणार होती;परंतु, पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. २४ जून ते १ जुलै या कालावधीत १हजार ५०० उमेदवार, २ जुलै राेजी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील १ हजार ६२ पुरुष उमेदवार व त्यानंतर ३ जुलै राेजी भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, तृतीयपंथी, होमगार्ड, पोलिस पाल्य, खेळाडू, प्रकल्पग्रस्त आदी प्रवर्गातील सर्व पुरुष उमेदवारांची चाचणी पार पडेल.

टॅग्स :PoliceपोलिसAkolaअकोला