अकोला : जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तर धावून जाणार्या संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाचे कौतुक प्रत्येक घटनेनंतर होते; मात्र कौतुकाच्या वर्षावात या पथकाला येणार्या अडचणी जाणून घेण्यात कुणालाही वेळ नसतो त्यामुळेच गेल्या पंधरा दिवसांपासून या पथकाकडे असलेले वाहन टायरअभावी बंद होते ही बाब 'लोकमत' ने मंगळवारच्या अंकात समोर आणली. या पथकाच्या सामाजिक बांधीलकीविषयी कुणालाही शंका नसल्याने ह्यलोकमतह्ण चे वृत्त वाचताच संवेदनशील दातृत्वाने मदतीचा अक्षरक्ष: पाऊस पाडला. या पथकाच्या गाडीला पाच टायरची व्यवस्था करून अकोलेकरांनी संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला आहे. अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दीपक सदाफळे या सामाजिक विचारांनी भारलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने लोकांना जीवन देणार्या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. अकोला जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला ह्यओह्ण देत तत्काळ धावून जाणार्या हा ध्येयवादी तरुणांचा हा संच. महसूल प्रशासनाला सदैव मदत करतो याची जाण व भान ठेवत तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने पुढाकार घेतला. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी ह्यलोकमतह्ण चे वृत्त वाचताच सकाळीच दीपक सदाफळे यांना फोन करून मदतीबाबत विचारणा केली. सदाफळे यांनी रोख स्वरूपात मदत नको, टायर हवेत असे स्पष्ट केले. प्रा. खडसे यांनी तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या कामासाठी तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी, संतोष शिंदे, राजेंद्र जाधव, विश्वनाथ घुगे, अकोला महापालिकेचे उपायुक्त समाधान सोळंके यांनी मदतीसाठी तत्काळ पुढाकार घेतला. त्यामुळे या संघटनेकडून तीन टायर मदत स्वरूपात उभे राहिले. एकीकडे प्रा. खडसे सर्वांंशी संवाद साधत असतानच दुसरीकडे अकोल्यातील कलावंत गजानन घोंगडे व सर्मथ कोचिंग क्लासेसचे प्रा. नितीन बाठे यांनीही सदाफळे यांच्याशी संपर्क साधून टायर देण्याची व्यवस्था करतो, असे स्पष्ट केले. सदाफळे यांनी प्रा. खडसे यांनी टायरसाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगून तुम्ही पूर्ण टायर न देता दोनच दिले तरी चालेल, असे नम्रपणे स्पष्ट केले. त्यानुसार संत गाडगेबाबा शोध पथकाची रुग्णवाहिका अखेर नव्या टायरने रस्त्यावर अधिक वेगाने सेवा कार्य करण्यास सज्ज झाली आहे.
संवेदनशीलतेच्या दातृत्वाचा ‘पाऊस’!
By admin | Published: July 13, 2016 1:42 AM