अकोट तालुक्यात व शहरात पावसाळा सुरू होण्याआधीच पावसाचे वातावरण आहे. दिवसभर प्रखर उन्हानंतर सायंकाळी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावाधाव झाली. जोरदार वारा सुटला होता. दरम्यान, शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचले. रंभापूर ते वारखेड या रस्त्याचे बांधकाम केले. विदेशी तांत्रिक पद्धतीचा गवगवा करीत हा रस्ता झाला. या रस्त्याकरिता अंदाजे ५१ कोटी रुपये खर्च झाला असावा, असा अंदाज पत्रकावरून मानण्यात येत आहे. परंतु, पावसाचे पाणी अकोट ते हिवरखेड यादरम्यान मोठ्या प्रमाणावर जागोजागी पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे रस्त्याची वाताहत झाली असून परिसरातील नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. अचानक पावसाने जोर पकडल्याने दिवसभर उकाड्यातील वातावरणात गारवा आला होता. काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे. जनमानसात अवकाळी पावसामुळे आजारात भर पडण्याची धास्ती आहे. जनावरांचा चारा व इतर शेतातील कांदा इतर पिकांना झळ पोहोचली आहे.
कोट...
पावसाळा लागण्यापूर्वी कोसळलेल्या पावसाने रस्त्यावर डबके साचले आहे. या रस्ताबांधणीवर अंदाजे ५१ कोटी खर्च लागला. परंतु, अवकाळी पावसानेच घरासमोर पाणी साचले. पावसाळा लागण्याआधीच रस्त्याची दुरवस्था होत आहे.
-राजू गावंडे, अकोट