- सचिन राऊत
अकाेला : शहरासह जिल्ह्यात गत १५ वर्षानंतर एवढ्या माेठ्या प्रमाणात पा्स झाला असून शहरातील विविध भागात माेठ्या प्रमाणात पूर आला हाेता़ ही पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर शहरातील विविध भागात पाहणी केली असता माेकळ्या प्लाॅटवर माेठ्या प्रमाणात पाणी थांबल्याने या प्लाॅटला सध्या तलावाचे स्वरूप आले आहे़. या तलावांमध्ये म्हशीचा वावर सुरू झाल्याने डासही माेठ्या प्रमाणात आले आहेत़. तलावातील साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी पसरली असून यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात सापडले आहे़. अकाेल्यात दाेन दिवस माेठा पूर आल्याने शहरातील विविध भागात पाणी शिरले हाेते़. खडकी परिसरातील अष्टविनायक नगर येथील डुप्लेक्स, प्राजक्ता कन्या शाळेच्या पाठीमागील भाग, काैलखेड यासह जठारपेठ, माेठी उमरी, लहान उमरी, शिवनी, अकाेट फैल, जुने शहर, डाबकी राेड, किराणा बाजार परिसरात पाणीच पाणी साचले हाेते़. या परिसरात अनेक बड्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेल्या माेकळ्या प्लाॅटवर, खुल्या भूखंडांवर प्रचंड प्रमाणात पाणी साचले असून या प्लाॅटला तलावांचे स्वरूप आले आहे़. या माेकळ्या प्लाॅटवर पाणी साचल्याने विविध सरपटणारे जीवजंतू, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे़. त्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात सापडले असून साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे़. मनपाने तातडीने पावले उचलून या परिसरातील साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़.
या भागात अद्यापही अडचणी
शहरातील खडकी परिसरात असलेल्या अष्टविनायक नगर, प्रगती नगर, म्हाडा काॅलनी, काैलखेड येथील प्राजक्ता कन्या शाळेच्या मागील भाग, निमवाडी बसस्थानक परिसर, स्नेह नगर, गीता नगर, गंगा नगर, वाशिम बायपास, माेठी उमरी, विठ्ठल नगर, लहान उमरी, सावंतवाडी, जठारपेठ, न्यू तापडिया नगर, रणपिसे नगर, रविनगर, गुडधी, जुने शहरातील बाळापूर नाका, डाबकी राेड, गाेडबाेले प्लाॅट, डाबकी, शिवनी, शिवर, चांदूर शिवार, आकाेट फैल, अशाेक नगर, दम्मानी हाॅस्पिटल परिसर या परिसरात आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़.
रस्त्यांची दयनीय अवस्था
शहरातील चारही भागात लाेकमतच्या चमूने पाहणी केली असता आकाेट फैल, जुने शहर, डाबकी राेड, गीता नगर, गंगा नगर, माेठी उमरी, काैलखेड, खडकी, शिवनी व शिवर परिसरातील अनेक ले-आऊटमध्ये जाण्यासही रस्ता नसल्याचे चित्र आहे़ दुचाकी घेऊन जाणे कठीण असून पायी चालणेही मुश्कील झाले आहे़. या परिसरातील नागरिकांनी या परिसरात रस्त्यांचे बांधकाम तातडीने करण्याची मागणी केली आहे़.
धूर फवारणी करण्याची मागणी
पूर ओसरल्यानंतर शहरातील बहुतांश माेकळ्या प्लाॅटवर माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे़. या पाण्यातून आता दुर्गंधी पसरली असून डासांचाही माेठ्या प्रमाणात उच्छाद सुरू आहे़. त्यामुळे शहरातील संपूर्ण परिसरात धूर फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ पावसाळ्यात अद्यापही धूर फवारणी झाली नसल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात सापडले आहे़.
घरासमसाेर माेठ्या प्रमाणात डबके साचले आहे़ या परिसरात पाच ते सहा माेठे भूखंड व खुले प्लाॅट असून त्यावर पाणी साचले आहे़. त्यात वराहांचा मुक्तसंचार असल्याने घाण पसरत आहे़. काही प्लाॅटवर तर म्हशी बसविण्यात येत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून यावर तातडीने उपाययाेजना करण्यात याव्या़.
निर्मला पवार
स्नेह नगर, गीता नगर, अकाेला
काैलखेड व खडकी परिसरात विद्रुपा नदीचा माेठा पूर आला़ त्यामूळे खुल्या भूखंडांवर माेठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्या पाण्याने आता दुर्गंधी पसरली आहे़. या पाण्यात् सापांचा वावर असल्याचे दिसून येते़ त्यामुळे मुलांना धाेका आहे़ शहरातील खुल्या भूखंडांवर मनपाने कारवाई करावी़, जेणेकरून ज्यांच्या मालकीचे हे भूखंड आहेत ते साफसफाई ठेवतील. पर्यायाने नागरिकांना आराेग्याचा प्रश्न निर्माण हाेणार नाही़.
गणेश मानकर
काैलखेड, खडकी अकाेला
आकाेट फैल परिसरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचा माेठा गंभीर प्रश्न आहे़. या नाल्यांच्या बांधकामासाठी मनपाने तातडीने पुढाकार घ्यावा़ नाल्यातील घाण पाणी व पावसाचे पाणी एकत्र झाल्यानंतर हे पाणी खुल्या भूखंडांवर साचले आहे़. त्यामुळे पूर्ण परिसरातच डासांचा माेठा उच्छाद असून नागरिकांना साथीच्या आजारांचा धाेका आहे़ तातडीने धूर फवारणी करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे़.
रवी शिंदे
सामाजिक कार्यकर्ता, अकाेला