राजरत्न सिरसाट/अकोलापावसाचे स्वरू प बदलले असून, संपूर्ण पावसाळ्य़ातील अर्धा पाऊस केवळ १५ तासांत अतिवेगाने कोसळत असल्याचा अभ्यास कृषी संशोधकांनी केला आहे. ५५ ते ६0 दिवस पडणारा पाऊस मागील दशकात ३0 ते ३५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी २0 जून रोजी २.४५ तासांत ३९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यातील ३0 मि.मी. पाऊस अवघ्या ४५ मिनिटांत पडला. या संदर्भातील अभ्यास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाणलोट क्षेत्रावर करण्यात आला आहे. राज्यात यावर्षी जवळपास हेच चित्र असल्याने कमी कालावधीच्या पिकांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाणलोट क्षेत्रावर पडणार्या पावसाचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात येत असून, यावर्षी मे महिन्याच्या ७ तारखेला २१ मि.मी. पावसाची नोंद येथे करण्यात आली. हा पाऊस चार ते सहा तासांत पडला असून, त्याचे प्रमाण हे ३ ते ५ मि.मी. प्रतितास होते. ७ जूनला ७.५ मि.मी. पाऊस झाला. ९ जून रोजी ३.५ मि.मी., तर २0 जून रोजी ३९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २२ जून रोजी ५ मि.मी. पाऊस १ तास ४९ मिनिटांत पडला. म्हणजेच या दिवशीचा पावसाचा वेग हा प्रतितास २.७५ मि.मी. एवढा होता.मागील वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ६२२. ३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, जून महिन्यातील सात दिवसांत ८९.२ मि.मी. पाऊस झाला. जुलैमध्ये चार दिवसांत ६३.५0 मि.मी., तर ऑगस्ट महिन्यातील आठ दिवसांत सर्वाधिक ३१३.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यातील पाच दिवसांत १५६.४ मि.मी., तर ऑगस्टमध्ये ५ तारखेला एकाच दिवशी १९४ मि.मी. पाऊस पडला. संपूर्ण पावसाळ्य़ातील ३२ टक्के हा पाऊस होता. जून महिन्यातील ८९.२ मि.मी. पावसापैकी ४४.९0 मि.मी. पाऊस 0.ते १0 मि.मी. प्रतितास वेगाने २0 तास ३९ मिनिटांत पडल्याची नोंद आहे. जुलैमधील ६३.५0 मि.मी. पैकी ३0.२0 मि.मी. पाऊस 0.ते १0 मि.मी. प्रतितास या वेगाने ४६ तासांत पडला. सप्टेंबर महिन्यातील १५६.४ मि.मी.पैकी ७0.४0 मि.मी. म्हणजे अर्धा पाऊस 0.ते १0 मि.मी. प्रतितास वेगाने १९.४0 मिनिटांत पडला. याच अभ्यासावरू न कृषिशास्त्रज्ञांनी मागील १८ वर्षांतील पडणार्या पावसाचे निष्कर्ष काढले असून, यावरू न पडणार्याचे पावसाचे दिवस कमी झाल्याचे समोर आले आहे.
पावसाचे दिवस झाले कमी!
By admin | Published: June 24, 2016 11:41 PM