अकोला: रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच वृक्षारोपणासाठी अकोलेकरांना आवाहन करण्यापूर्वी आधी स्वत:च्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून किमान १० वृक्षांची लागवड करा, असा आदेशच महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी सोमवारी जारी केला. यासोबतच कर्मचाºयांनी स्वत:चा मालमत्ता कर जमा करण्याचे सुचवित या तिन्ही विषयांवर अपयशी ठरल्यास जुलै महिन्यापासून वेतन कपात निश्चित असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला.महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी चौदा दिवसांच्या कालावधीनंतर सोमवारी मनपात दाखल होत विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला. यादरम्यान, रेन वॉटर हार्वेस्टिंग (जल पुनर्भरण) तसेच वृक्ष लागवडीसाठी अकोलेकरांना आवाहन करण्याआधी महापालिका कर्मचाºयांनी या कामासाठी स्वत: पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या आस्थापनेवर २ हजार ३०० कर्मचारी आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वत:च्या घरापासून रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुरुवात करण्याचा आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिला. तसेच प्रत्येक कर्मचाºयाने किमान १० वृक्षांची लागवड करून मालमत्ता कराचा भरणा करण्याचे निर्देश दिले. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत या तिन्ही बाबी शक्य न झाल्यास संबंधित कर्मचाºयाच्या वेतनावर गंडांतर येईल, असा सज्जड इशारा आयुक्त कापडणीस यांनी दिला. आयुक्तांच्या या रोखठोक भूमिकेमुळे काही विभाग प्रमुख व कर्मचाºयांच्या पायाखालची वाळू सरकल्याची माहिती आहे....तर घ्यावे लागेल झोन अधिकाºयांकडून प्रमाणपत्रघराच्या अंगणात रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचे जिओ टॅँगिगसह प्रत्येक टप्प्यावरील छायाचित्र काढावे लागतील. तसेच झोन अधिकाºयांकडून रीतसर प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. अर्थात, आयुक्तांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे दिसून येते. झोन अधिकाºयाने तपासणी न करता परस्पर प्रमाणपत्र दिल्यास सदर प्रकार त्यांच्याही अंगलट येण्याची दाट शक्यता आहे.जिओ टॅँगिंग आवश्यकमनपा कर्मचाऱ्यांना १० वृक्ष लावण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लावताना जिओ टॅगिंग आवश्यक आहे. घराच्या अंगणात, परिसरात, कॉलनीमध्ये आदी ठिकाणी वृक्षारोपण करताना स्थानिक रहिवाशांना त्यामध्ये सामील करून घेण्याची जबाबदारी कर्मचाºयांवर दिली आहे. वृक्षलागवड न करता त्याच्या संगोपनाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्याकरिता टप्प्याटप्प्याने जिओ टॅँगिग करण्याचे निर्देश आहेत. ही सर्व प्रक्रिया जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत करावी लागणार आहे.
अकोलेकरांमध्ये जनजागृती करण्याआधी आम्ही स्वत: कृती करणे अपेक्षित आहे. त्याची सुरुवात माझ्यापासून होईल. या मोहिमेत सर्व कर्मचाºयांना रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड व मालमत्ता कर जमा करणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचे पालन होईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा कारवाईचा पर्याय खुला आहे.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा