प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अकोला बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. दुपारी मतदानानंतर मतमोजणी झाली. यामध्ये ॲड. राजेश जाधव हे मताधिक्क्याने विजयी झाले. अध्यक्षपदासाठी ॲड. राजेश जाधव आणि विजयकुमार गोयनका यांच्यात लढत होती. ॲड. जाधव यांना ७१३ तर विजय गोयनका यांना २९१ मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. त्यात ॲड. सुमित बजाज यांना ४०७ मते मिळाली. तर ॲड. देशमुख ५९७ मते घेऊन विजयी झाले. महिला उपाध्यक्ष पदासाठी ॲड. संगीता भाकरे ५२२ मते घेऊन निवडून आल्या. तर ॲड. सुनीता कपिले यांना ४९७ मते मिळाली. सचिव पदासाठी तीन उमेदवार उभे होते. ॲड. धीरज शुक्ला विजयी झाले. ॲड. धीरज शुल्का हे ४२२ मते घेऊन विजयी झाले. तर दुसऱ्या क्रमांकाची ४१५ मते ॲड. राहुल वानखडे यांना मिळाली. ॲड. जयेश गावंडे यांना १७८ मते मिळाली.
बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश जाधव, उपाध्यक्ष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:18 AM