याप्रसंगी मॉं जिजाऊ व्यायाम प्रशिक्षण मंडळातील मुला-मुलींनी लाठी काठी, तलवारबाजी आदी कलेचे सादरीकरण करून अनोख्या पद्धतीने जिजाऊंना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. ब्रिजमोहन गांधी, प्रमुख पाहुणे म्हणून संतोष झामरे, मनोज झाडे, नगराध्यक्ष हरिणारायन माकोडे, पुरुषोत्तम चौखंडे, प्रदीप खोटरे, पाचपोर, सीमा चौखंडे, श्रीकांत तळोकार, त्र्यंबकराव वैराळे, वैष्णवी चौखंडे उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात व्यायाम शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेले प्रशिक्षण व भविष्यात दिले जाणारे प्रशिक्षण व सोयी याबद्दल पुरुषोत्तम चौखंडे यांनी माहिती दिली. जीवनात अनेक चढ-उतार येतात. यावर मात करण्यासाठी प्रत्येकांनी सक्षमपणे उभे राहणे गरजेचे आहे. यशोशिखर गाठण्यासाठी व्यक्तिमत्त्वाचा विकास हा सक्षमतेणे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मनोज झाडे यांनी केले. व्यक्तिमत्त्वातून अनेक पैलू उलगडून मानवी जीवन समृद्ध करता येऊ शकते व मॉं जिजाऊ व्यायाम प्रशिक्षण मंडळातर्फे होत असलेले कार्य गौरवपूर्ण असल्याचे प्रतिपादन ॲड. ब्रिजमोहन गांधी यांनी अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माॅ जिजाऊ व्यायाम प्रशिक्षण मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. (फोटो)