जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मूग पिकाचा विमा मिळाला आहे. तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण मंडळाला सोयाबीन पिकाचा विमा मिळाला आहे. उर्वरित जिल्ह्यातील मंडळाला सोयाबीन व इतर पिकाचा विमा कंपनीने शेतकरी बांधवांना मंजूर केला नाही. जिल्ह्यातील आणेवारी ५० पैशांच्या आत असतानाही शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली होती. अशा परिस्थितीमध्ये ५० पैसे आणेवारी आणि अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे नुकसान झाले असतानाही पीक विमा कंपनीने हेतुपुरस्सर शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, कर्जबाजारीसुद्धा झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्याकरिता शासनाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता पीक विमा कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याची राकाँची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:14 AM