अकोला : मन, शरीर आणि उत्साह यांचे उत्तम संतुलन म्हणजेच परिचारिका, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी केले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.जागतिक परिचारिका दिनानिमित्त रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून उत्साहात रॅली काढण्यात आली. अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे आणि वैद्यकीय अधीक्षक श्यामकुमार शिरसाम यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश नैताम, अधिसेविका ग्रेसी मरियन, सहायक अधिसेविका सुमन पातोंड, सहायक अधिसेविका प्रियंका जाधव, नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य सरिता राठोड यांनी फ्लॉरेंस नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. यानंतर उपस्थित परिचारिका व अधिपरिचारिका आणि प्रशिक्षणार्थिनींनी मेणबत्ती लावून रुग्णसेवेची शपथ घेतली. प्रस्तावना सुनीता उगले यांनी केली. संचालन परिसेविका संगीता जोध यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा वाघ, अरुणा कांडलकर, छाया डोंगरे, सुनीता सावळे, श्वेता मुर्तरकर, सरला भदे, कांचन साठले, सुनीता उगले, माया खिरेकर, शारदा चौथमल, सूचिता टेमधरे, वैशाली वल्लमवार, उषा दुबाले, सविता मोडकर, पूजा इंगळे व संध्या उमाळे यांनी परिश्रम घेतले.