अकोला : राम कदमच भाजपचा खरा चेहरा आहे. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांवर भाजप धूळफेक करीत आहे. मराठा-बौद्ध बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी घटनाविरोधी कारवाया करीत आहे. या शब्दात माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस-सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य जयदेवराव गायवाड यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. आगामी २०१९ च्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने राज्यभरात संघटन आणि मोर्चे बांधणी सुरू केली असून, शनिवारी ते अकोल्यात होते. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डॉ. संतोषदादा कोरपे, प्रा. विश्वनाथ कांबळे, पंडित कांबळे, श्रीकांतदादा पिसे प्रामुख्याने उपस्थित होते.विदर्भातील मेळघाट, मेडशी, किनवट, दारव्हा, दिग्रस, कारंजा, मूर्तिजापूर परिसराचा अभ्यास ते करणार आहेत. या अभ्यास दौºयादरम्यान आढळलेल्या स्थितीचा आढावा निवडणुकीदरम्यान महत्त्वाचा ठरणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. देशात आणि राज्यात जातीय तेढ निर्माण करणाºया घटना घडत असून, सरकार पुरस्कृत दंगली घडत आहेत. कोरेगाव भीमाचे उदाहरण त्यांनी येथे स्पष्ट केले. कोरेगाव भीमातील आरोपींना अजूनही अटक नाही. उलटपक्षी यातील भिडे-एकबोटे यांना वाचविण्यासाठी एल्गार परिषदेतील कार्यकर्त्यांना अडचणीत आणले जात आहे. नक्षलवादी संघटनांशी त्यांचा संबंध नाही, असेही ते बोलले. भाजपचे अनेक छुपे अजेंडे आहेत. मागासवर्गीयांचा सुवर्ण इतिहास दर्शविणाºया कोरेगाव भीमाचा विजयी स्तंभ ब्रिटीशांचा संबोधून नष्ट करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला. जातीय तेढ निर्माण करून संविधानात बदल करू पाहणाºया भाजपला येत्या २०१९ मध्ये आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. शेतकºयांच्या आत्महत्या आणि मागासवर्गीयांवर अन्याय हे दोन मुद्दे आगामी निवडणुकीत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.