अकोला : साहित्यिक डॉ. रामप्रकाश वर्मा लिखित तीन हिंदी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा ३0 नोव्हेंबर रोजी सायंकाळी येथील आयएमएल सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण गोयनका तर प्रमुख अतिथी म्हणून खंडवा येथील साहित्यिक डॉ. प्रतापराव कदम, भुसावळचे डॉ. सुरेश नारायण कुसुंबीवाल, जळगावचे डॉ. तेजपाल चौधरी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. रामप्रकाश वर्मा लिखित गीत संग्रह ह्यरूकूं क्यों पथकर चुकानेह्ण, काव्य संग्रह ह्यनई सुबह सिरहाने परह्ण आणि लोककथा संग्रह ह्यचील चूल्हा ले उडीह्ण या तीन हिंदी पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. शिवाजी महाविद्यालयातील हिंदी विभागाचे अध्यक्ष डॉ. वर्षा शाह यांनी समीक्षण केले. प्रा. मणि खेडेकर, डॉ. शोभा भागडे, घनश्याम अग्रवाल, डॉ. मोहन खडसे, कृष्णकुमार शर्मा, हरिनारायण धिमान, नरेश शाह, मुलचंद मिश्रा, मुख्याध्यापक पी. एस. लांडे, दिनेश शुक्ला, डॉ. अजिर्नबी यूसुफ शेख, मुख्याध्यापक संघाचे चौधरी, विजय मलकान, वाजपेयी यांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला. प्रा. शारदा बियाणी, प्रा. निभा शर्मा, प्रा. कोमल श्रीवास, प्रा. आभा खेडेकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. स्वावलंबी विद्यालयाच्या प्राध्यापिका सुमंगला बुरघाटे यांनी डॉ. रामप्रकाश वर्मा यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. प्रमुख मान्यवरांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. पुनम मानकर (पिसे) यांनी, प्रास्ताविक शैलेंद्र दुबे यांनी, तर आभार नम्रता धिमान यांनी मानले. गायत्री तिवारी हिच्या शारदा स्तवनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
रामप्रकाश वर्मा यांच्या पुस्तकांचे विमोचन
By admin | Published: December 01, 2014 12:24 AM