अकोला- अकोला महानगरातील गीता नगर रस्त्यावरील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पावन रामदेवबाबा-शामबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवार दि.१६ फेब पासून भक्तिभावात प्रारंभ होत असून हा उत्सव आगामी सात दिवसापर्यंत चालणार आहे.
यात खाटु नरेश,बाबा रामदेव व हनुमानजी यांचा मंगलमय प्राणप्रतिष्ठा मांगलिक वातावरणात प्रारंभ होणार आहे.नूतन मंदिरात रंगीत विद्युत रोषणाई व व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवार दि.१६ फेब.रोजी दु.३ वा. स्थानीय राणी सती धाम येथून मंदिरापर्यंत भव्य मंगल कलश शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात रथ,अश्व, दिंडी व भजनी मंडळे महिला-पुरुष भक्तांसमवेत सहभागी होणार आहेत.शनिवार दि.१७ फेब.रोजी सकाळी ११ .२४ वा मंगल प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊन दुपारी पूर्णाहुती होणार आहे.दु.३.३० वा. मंदिर प्रांगणात आर्वी येथील जम्मा गायक देवेंद्र राठी यांचे जम्मा जागरण होणार आहे .सोहळ्यात विदर्भ मीरा संत अलंकाश्री उत्तरकाशीचे महामंडलेश्वर श्री १००८ स्वामी कमलेशनन्द ,महंत नरेशबाबा पांढरी, महंत रमेशबाबा पांढरी आदी संतांची मंगलमय उपस्थिती लाभणार आहे .
रविवार दि.१८ रोजी दु.१२ वा. महाप्रसाद होऊन साय ७ व. प्रदीप शर्मा यांची संगीतमय भजन संध्या होणार आहे.सोमवार दि.१९ फेब.रोजी साय.७ वा .राधाकृष्ण सत्संग भजन मंडळ यांची सामूहिक भजन संध्या होणार आहे .मंगळवार दि.२० फेब रोजी साय .७ वा. भजनकार उमेश शर्मा उर्फ डब्बू व कुमारी नेतल यांची संयुक्त भजन संध्या होणार आहे.बुधवार दि.२१ फेब.रोजी दुपारी ३ वा .महोत्सवस्थळी हैद्राबाद येथील प्रख्यात जम्मा जागरणकार सुशील गोपाल बजाज यांचे जम्मा जागरण आयोजित करण्यात आले आहे.शनिवार दि.२४ फेब.रोजी साय.७ वा. राजराजेश्वर दरबार सुंदरकांड मंडळ व शाम शर्मा व देवेंद्र तिवारी यांचे सुंदरकांड सादर होणार आहे .रविवार दि.२५ फेब.रोजी साय.७ वा. राजेश सोमाणी यांची भजन संध्या होऊन दि.२६ फेब.रोजी.साय.७ वा. भजनकर राम पांडे ,कु.माधुरी जोशी व संच संगीतमय भजने सादर करणार आहे.मंगळवार दि.२७ फेब.रोजी मोठ्या भक्तिभावात या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा समारोप होणार आहे .या समारोपीय सोहळ्यात कोलकत्ता येथील प्रख्यात भजन सम्राट शाम शर्मा यांची खाटु नरेश शामबाबा व रामदेव बाबा यांच्या अवतारावर भव्य भजन संध्या सादर केली जाणार आहे.या पावन उत्सवात सर्व महिला-पुरुष भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शामबाबा-रामदेवबाबा सेवा समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.