आत्मा अंतर्गत स्थापित १४ शेतकरी व महिला बचतगटांनी सहभाग नोंदवून २७ प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात फांदीची भाजी, शेवगा, चवळी, मुंगी, चमकुरा, कटूले, अंबाडी, कड्डू, चिवळ, दुधी भोपळा, मटार, कवठ, केना, गुळवेल, सुरण कंद, घोळ, तांदुळजीरा, कपाळ फोडी, पाथरी, वंडोळे, पिंपळ, उंबर, पुदिना, करवंद, शेरणी, अशा प्रकारच्या २७ भाज्यांचा समावेश होता. या महोत्सवात अनभोरा, विराहीत, आमतवाडा, हातगाव, लाखपुरी, धानोरा, कारली, चिखली, मंगरूळकांबे, हिरपूर आणि भगोरा येथी शेतकरी व महिला गटांनी सहभाग नोंदविला, यासाठी तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, विजय शेगोकार, सुहास भेंडे, विठ्ठल गोरे, व्ही एल चव्हाण, संदीप गवई आदींचे योगदान लाभले असून, २०० च्यावर नागरिकांनी व शेतकऱ्यांनी भेट दिली.
रानभाजी महोत्सवास प्रतिसाद : २७ प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:23 AM